आजीचे रव्याचे लाड़ू

माझ्या आजीला 3 मुलं. माझ्या 2 आत्या आणि माझे बाबा.

आणि प्रत्येकाची 2 पोरं, अशी आज्जीची 6 नातवंडं.

सणा सुदीला आमच्या कडे फुल धिंगाणा असायचा. सगळा स्वयंपाक आई आणि आजी घरीच बनवत असत, अगदी विडा सुद्धा घरच्या वेलाच्या पानांचा.

6 पैकी आम्ही चौघे जण पक्के गोडे. म्हणजे गोड आवडणारे. आणि मग आजीचा उत्साह अजुनच वाढायचा.  

आजी माझी मोठी सुगरण! आणि पुरण पोळी ही तिची usp होती.  मी शो ऑफ़ नाही करत, पण ख़रचं, आत्ता पर्यंत मी खूप भारी पुरण पोळ्या खाल्ल्यात, पण माझ्या आजी सारखी कुठेचं नाही.

त्यामागे पण एक logic असेल.   

आजीच्या हातची चव, त्या वेळचा स्वयंपाक घरातला दरवळणारा सुगंध, आजीच्या मऊ साडी चा स्पर्श, रेडिओ वर तिने लावलेली गाणी, ते दिवस, त्या आठवणी ह्यांचं एक combination fit झालंय माझ्या डोक्यात. आणि म्हणून कदाचित मला तिचीचं पुरण पोळी जगात भारी वाटते.  

कारण काही असो, आजीचे सगळेच पदार्थ खूप अफलातून व्हायचे. 

आजी ला माहित होतं की मला गोड आवडतं. तर ती नेहमी माझ्यासाठी काहींना काही गोड बनवायची.   

जशी जशी मी मोठी झाले तसं तसं माझं वजन पण मोठं होत गेलं, आणि मग मी गोड कमी खाऊ लागले. कडक diet ची थेरं पण केली. त्या काळात आजी चा मात्र प्रॉब्लेम झाला.


  

एकदा तिने माझ्यासाठी रव्याचे लाडू केले होते, ओल्या नारळाचे. किती कष्ट पडले असतील. वयामुळे तिला नीट चालता यायचं नाही, जास्त वेळ उभं पण राहू नाही शकायची. पण तरीसुद्धा तिने पाक वगैरे करून माझ्या साठी लाडू केले, आणि मी काही विचार करता म्हणलं "माझं diet चालूये आजी, मी लाडू नाही खाऊ शकणार"

आजी बिचारी कोड्यात पडली. डाएट मधे लाडू का नाही खायचे हे काही तिला कळेना.    


आजीचं प्रेम म्हणजे आपल्या नातवांसाठी खाऊ करणे आणि आम्ही खाऊन दाद दिली की आजी खूष, तिचं mission successful

   

तिच्या प्रेमाची ही definition होती. आणि म्हणून तिच्या पदार्थांना वेगळी स्पेशल चव होती- तिच्या मायेची.

आणि ही चव जगातला कुठला पण मास्टर शेफ़ नाही आणू शकत.  


आज आजीची आणि तिचा रव्याच्या लाडूंची खूप आठवण आली म्हणून हे सगळं लिहिण्याचा अट्टाहास..!

Comments

Popular Posts